बीड । वार्ताहर
जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत शं. महाजन व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदशर्र्नाखाली सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज व आयुष विभाग जिल्हा रूग्णालय बीड यांचे संयुक्त विद्यमाने रोगप्रतिबंधक होमिओपॅथीक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. शुक्रवारी हा कार्यक्रम संपन्न झाला.
बीड मुख्यालयातील न्यायाधीश वर्ग व कर्मचारी वर्गांनी या औषधींचा लाभ घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथीक औषध कसे उपयोगी आहे या बाबतची माहिती कार्यक्रमाच्या सुरूवातीला होमिओपॅथीक कॉलेजचे विश्वस्त डॉ. अरूण भस्मे यांनी थोडक्यात सांगितले. तसेच सदर औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नसून ते कशा पद्धतीने घ्यावयाचे आहे या बाबतीच माहिती डॉ. महेंद्र गोशाल प्राचार्य-रूग्णालय अधिक्षक यांनी दिली. सामाजिक अंतर पाळून व सॅनिटायर्झचा वापर करण्यात आला व अतिशय शिस्तीमध्ये औषधांचे वाटपाचा कार्यक्रम पार पडला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गणेश पांगारकर, डॉ. अंजली पवार, डॉ. नेहा, डॉ. क्षमा, डॉ. संगीता, दिनकर काळे, साईनाथ हेंद्र, राहुल गायकवाड, महेश शेजेकर, विक्री खांडेकर, सपना सिस्टर तसेच जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव शरद देशपांडे, अधिक्षक व कर्मचारी, जिल्हा न्यायालयाचे अधिक्षक व कोर्ट मॅनेजर पिंपळे यांनी परिश्रम घेतले.
Leave a comment