डोंगरकिन्ही । वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील डोमरी येथिल रहिवासी व थेरला येथिल जि प मा शाळेचे शिक्षक अरुण शरदराव भोंडवे (58) यांचे दीर्घ आजाराने पाटोदा येथिल राहत्या घरी दुःखद निधन झाले, डोमरी येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
स्व.अरुण भोंडवे हे जि.प.शाळेचे गणित विषयाचे उत्कृष्ट व विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. बीड जिल्हयातील अनेक माध्यमिक शाळेत त्यांनी अध्यापणाचे काम केले आहे. शांत, संयमी असलेलेत भोंडवे सर हे डोंगरकिन्ही येथे सर्वात जास्त काळ शिक्षक होते. सहा महिन्यापूर्वीच त्यांची थेरला येथे बदली झाली होती. एक वर्षापासुन त्यांना मधुमेह, रक्तदाब आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर औरंगाबाद व पुणे येथे उपचार चालु होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते जाऊ शकले नाहीत. त्यांच्यासेवानिवृत्ततीला अवघे आठच दिवस शिल्लक असताना त्यांचे पाटोदा येथिल राहत्या घरी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, मुलगा, भाऊ आई आहे. त्यांच्या वर डोमरी येथे साश्रुनयनात अगदी फक्त नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एक प्रेमळ शिक्षकाचे अचानक दुःख निधन झाले. त्यांच्या या दुःखत निधनाने डोंगरकीन्ही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक वर्गात, व विद्यार्थीत शोककळा पसरली आहे.
Leave a comment