केज । वार्ताहर
गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबीत असलेल्या कोरेगाव ते पन्हाळवाडी रस्त्यासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे व जिल्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेतून तब्बल 1 कोटी 79 लक्ष रूपयांचा निधी जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी विशेष प्रयत्न करूण मंजूर करूण घेतला होता.
केज तालुक्यातील विडा जिल्हा परिषद गटातून जाणारा रामा-56 कोरेगाव-कोठी-पन्हाळवाडी (येवता) रस्ता गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित पडल्यामुळे या भागातील नागरीकांना ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आसल्याने सदरील रसत्याचे काम करण्याची मागणी या भागातील नागरीक करत होते. अखेर लोकनेत्या पंकजाताई मुंडे व जिल्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्याकडे विशेष प्रयत्न करूण या भागाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी सदरील रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेतून तब्बल 1 कोटी 79 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करूण घेतला होता. मागील काही महिन्यापूर्वी जिल्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. आजच्या घडीला रस्त्याचे काम प्रगतिपथावर सुरू आसून आज विडा जिल्हा परिषद गटाचे कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी प्रत्यक्ष कामाची पहाणी करत गावकर्यांसोबत चर्चा केली व अधिकार्यांना काम दर्जेदार करण्याच्या सूचना केल्या. प्रसंगी इंजिनिअरिंग राठोड साहेब, गुत्तेदार राहूल थोरात, शक्ती केंद्र प्रमुख बाप्पा डोंगरे, कोठीचे उपसरपंच विजय डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक डोंगरे, संतोष कोकाटे, सुभाष गुरव, वचिष्ट येळवे यांची उपस्थिती होती.
Leave a comment