सारणीच्या माळी आप्पाला कपड्यांचा केला आहेर
केज । वार्ताहर
कोरोनाच्या लढाईत केज तालुक्यातील सारणी (आ) या गावाची काळजी घेणारे श्रीमंत गोरे (माळी आप्पा) यांच्या कार्याची दखल दै. पुण्य नगरीने घेतली होती व त्यांची बातमी छापली होती त्याच अनुषंगाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते व आधार फाऊंडेशनचे सक्रिय सदस्य गणेश शिवाजी सोनवणे यांनी श्रीमंत गोरे यांना एक नविन ड्रेस, श्रीफळ, पुष्गुच्छ देऊन फेटा बांधून त्यांचा सत्कार केला यावेळी केज तालुका युवक काँग्रेस व आधार फाऊंडेशन सारणी (आ) च्या वतीने देखील श्रीमंत आप्पा गोरे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
एकाद्या व्यक्तीला त्याचे काम म्हणून नाही मात्र त्या कामात असलेला रस व असलेली तळमळ मोठं काम करायला भाग पाडत असते व असाच प्रकार सारणी (आ) येथे श्रीमंत गोरे यांच्या बाबतीत आहे. माळी आप्पा म्हणून गावाला परिचित असलेले आप्पा कधीही कुठेही अडचणीत गावात हजर असतात मग ते काम काहीही असो व आज कोरोनाशी युद्ध सुरू असताना आप्पा मागे राहतील ते कसे ? म्हणूनच आप्पांच्या कामाची दखल घेत त्यांचा शनिवारी गावात तरूणांनी सत्कार केला. गावात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गणेश शिवाजी सोनवणे यांनी आपांच्या कामाची नोंद घेत त्यांना एक ड्रेस घेतला व फेटा बांधून श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले. यावेळी केज तालुका सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष, व दै.पुण्य नगरीचे पत्रकार संतोष (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते आप्पांच्या सत्कार करण्यात आला तर युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुजित सोनवणे, बाजीराव सोनवणे, ग्रामसेवक वटाणे साहेब, सरपंच पती गोविंद शिंदे, रवि सोनवणे, दत्ता सोनवणे, सुनिल सोनवणे, दिलीप सोनवणे वैभव सोनवणे, आशिष सोनवणे, बापू शिंदे, अविनाश खरात यांनी यावेळी गोरे यांनाही आप्पांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. व स्वतःची काळजी घ्या असे अवाहन या तरुणांनी आप्पाला केले.
Leave a comment