जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या पोहचली 33 वर
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून शनिवारी (दि.23 सकाळी लातूरच्या प्रयोगशाळेत 43 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रात्री हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यात 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 39 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
एका अहवालाचा कोणाताही निष्कर्ष निघालेला नाही अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.शनिवारी बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये 1 जण कुंडी (ता.धारुर) येथील राहिवासी आहे अन्य दोघांमध्ये एक जण वडवणी तर दुसरा बीड येथील आहे. बीडमधील बाधित व्यक्ती हा मुंबईतून परतला होता, त्याचे पालवण चौकात घर आहे, मात्र घरी न जाता लक्षणे जाणवल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तर वडवणी येथील बाधित रुग्ण हा यापूर्वी वडवणीत निष्पन्न झालेल्या बाधिताच्या संपर्कातील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान आता जिल्ह्यात उपचार घेणार्या एकुण बाधित रुग्णांची संख्या 33 झाली आहे. कुंडी व वडवणी येथे यापूर्वीही एक जण बाधित सापडलेला आहे.
Leave a comment