आम्हाला अत्यावशक गोष्टीसाठी तरी सूट द्या!! -बोरगाव ग्रामस्थांची मागणी
नेकनुर/वार्ताहर
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात पाथर्डी येथे कोरोणा बाधित रुग्ण आढळल्याने केज तालुक्यातील काही गावे बफर झोनमध्ये टाकण्यात आली यामध्ये बोरगाव बु. या गावाचा समावेश असून दोन महिन्यापासून गावाच्या प्रवेशद्वारावरच चेकपोस्ट असल्याने अडकून पडलेल्या बोरगावकरांना दुसऱ्या जिल्ह्यातील बाधित व्यक्तीमुळे अत्यावश्यक सेवेलाही मुकावे लागत आहे. किराणापासून पिठाच्या गिरण्या पर्यन्त निर्बंध लागले आता तर पेरणीसाठी आवश्यक असणारे खते ,बी-बियाणे यांची वाहनेही चेक पोस्टवर अडकून पडू लागल्याने येणाऱ्या काळात खते बी-बियाणे कशी उपलब्ध करायची या प्रश्नाने ग्रामस्थांना घेरले आहे. पावसाला थोडा अवकाश असल्याने पूर्वीच बियाणे मागवणे दुकानदारांना गरजेचे असते एन वेळी याची उपलब्धतता होईल याची शाश्वती नसल्याने कृषी विक्रेते, शेतकरी खते बियाण्यांच्या खरेदीला लागले असतानाच दुसऱ्या जिल्ह्यातील शिवाय जिल्ह्याची सीमा खोदून बंद केली असताना मध्यंतरी दोन गावांचे अंतर असताना पाथर्डी ता. कळंब या गावामुळे बोरगावकरांसाठी निर्माण झालेले बफर झोन मोठ्या अडचणी निर्माण करू लागले आहे . ज्या पाथर्डीतील रुग्णामुळे ही वेळ आली ते एकतर दुसऱ्या जिल्ह्यातील असून त्यांचे रिपोर्ट काल निगेटिव्ह येताच या गावाच्या अगदी जवळील कळंब पूर्ववत सुरू झाले असल्याने बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता परवानगी घेऊन आलेले दूरवरून आलेले खते बी-बियाणे दुकानापर्यंत पोचविण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे नसता पाऊस पडल्यानंतर जिल्ह्याच्या सीमेवरील या गावाला यासाठी दूरवर जाऊन बियाणे मिळतील याची खात्री नाही. ग्रामस्थाच्या मागणीचा जिल्हाधिकाऱ्यांनी सहानुभूती पूर्वक विचार करत शिथिलता द्यावी अशी मागणी बोरगाव येथील कृषी विक्रेते , ग्रामस्थांनी केली आहे.
Leave a comment