कमिटीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत मधील
लोकप्रतिनिधी सहकार्य करत नसल्याचा आरोप..
डोंगरकीन्ही /अमोल येवले
कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गावागावता कोरोना प्रतिबंधात्मक समिती स्थापन करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर गावातील लोकप्रतिनिधी ,बरोबरच नागरिकांचे सहकार्य असायला हवे. मात्र डोंगरकीन्ही येथील कमिटीचे अध्यक्ष व ग्रामपंचायतमधील लोकप्रतिनिधी कुठलेही सहकार्य करत नसल्याचा आरोप करत डोंगरकीन्ही कोरोना प्रतिबंधात्मक ग्रामसुरक्षा पथकाचा सामूहिक राजीनामा आज दिनांक 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सरपंच यांच्याकडे सोपविण्यात आला. व तो स्वीकारण्याची विनंती करण्यात आली.
कोरोना दक्षता कमिटी मध्ये काम करत ग्रामपंचायत,व लोकप्रतिनिधी,व प्रशासन यांच्या कडून कुठलेही सहकार्य होत नसल्याचे दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे. मात्र या प्रकारा मुळे डोंगरकीन्ही परिसरात मात्र चर्चेला उधान आले आहे. सरपंच, प्रशासन राजीनामा स्वीकारणार का..? का दक्षता कमिटीचे मत परिवर्तन करणार लवकच कळेल.या वेळी कोरोना दक्षता कमिटीचे सध्या डॉ.दुषांत येवले ,धनंजय इंगळे,अमोल पाटील येवले, विलास येवले,प्रवीण काथवटे, आण्णा खिंडकर,दादासाहेब येवले, अतुल दळवी, इत्यादी राजीनामा देतांना उपस्थित होते .
Leave a comment