गेवराई । वार्ताहर
गेली चार महिन्यां पासून संपुर्ण जग कोरोनो नावांच्या विषाणूचा थैमान घातले असुन आज अनेक कोरोनोग्रस्त रूग्णांचा मृत्यू झालालेला आहे तरी कोरोनो नावांच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केद्र व राज्यसरकारच्या वतीने गेली दोन महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू आहे अशा परिस्थितीत देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊनच्या काळात प्रत्येक गोरगरिबांना रेशन मिळावे म्हणून प्रती व्यक्ती 5 किलो फ्री तांदूळ देऊन अनेक गोरगरिबांना आधार दिला आहे पण सरकारने दिलेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रारी कार्डंधारकांनी केली होती पण प्रशासकीय अधिकारी यांनी सदरील दुकानादांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे तसेच रेशनकार्ड नसलेल्या कुटूंबाला धान्य दिले नाही त्यामुळे सर्व सामान्यात सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रोष आसल्याचे दिसुन येत आहे तर सरकारने केलेल्या घोषणेची राज्यसरकार व प्रशसानात मोठ्या प्रमाणात एक वाक्यता नाही त्यामुळेच कोरोनो नावांच्या रोगाला रोखण्यासाठी राज्यसरकारला अपयश आले आहे तर देशात असलेल्या कोरोनोग्रस्ताची संख्या पहाता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे तसेंच मृत्यूचे दर सुध्दा इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सरकार व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
दिलेल्या निवेदनात ते म्हणाले की कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन सुरू केला आहे पण घरात थांबून गोरगरिबांना महामारी सोबतच उपासमारीला सामोरे जावे लागत आहे तसेच आरोग्य आधिका-यांना सुविधाचा अभाव आहे तसेच कुटूंबा पासून बदोवस्तावर असलेल्या पोलीस आधिका-यांवर हल्ले होऊ लागले आहेत त्यामुळे आरोग्य आधिकारी व पोलिस आधिका-यांचे मनोबल खचत आहे त्यांमुळे आधिका-यांचे मनोबल खचू नये म्हणून सरकारने काळजी घेणे आवश्यक आहे तसेच शेतक-यांकडे सुध्दा दुर्लक्ष होत आहे हंगामाचे काम सुरू करण्यासाठी शेतक-यांना मोठ्या आर्थिक मदतीसाठी सरकारने पाऊल उचलणे आवश्यक आहे पण राज्यसरकार व प्रशासना मध्ये समन्वय नाही समाजकल्यान मंञी यांनी निराधार योजनेतील लाभार्थ्य्यासाठी तिन महिन्याचे अनुदान देण्याची घोषणा केली पण प्रत्येक्षात तहसील कार्यालयाला निराधाराचे बजेट नसल्याने निराधाराचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले आहेत त्यामुळे सरकारने केलेली घोषणा फक्त घोषणाच आसल्याचा प्रत्येक नागरिकांना अनुभव येत आसल्यांचे आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
सध्याच्या कोरोनोच्या परिस्थितीला नियञंणात आणन्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे गेवराई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्या हस्ते आज दि.19 रोजी ना.तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी प्रकाश सुरवसे,नगराध्यक्ष सुशील जवंजाळ,इश्वर पवार,संजय आधळे,प्रल्हाद येळापूरे आदि उपस्थित होते
Leave a comment