कुसळंब । वार्ताहर
देशभर हाहाकार माजवलेला कोरोना वहाली सारख्या छोट्या गावात आल्याने नागरिक घाबरले आहेत वहाली परिसरातील जनतेनी स्वताह सह परिवाराची काळजी घ्या घाबरून जावू नका असे माऊली जरांगे यांनी आवाहन केले आहे.
पाटोदा तालुक्यातील पाटोदा शहर व वहाली येथे मुबंईवरुन आलेल्या नागरिकांना कोरोणाचा ससंर्ग झाल्याचे लक्षणे दिसुन आले असता तातडीनं यांना जिल्हारुग्णलयात पाठवुन त्यांचे साँब पाडवले यात तीघांना कोरोणा झाल्याचे स्पष्ट झाल्याने जनतेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले वहाली सह तीन किमी अंतरावर गावे कंटेनमेट झोन करुन सिल केली कोणी बाहेर येते नाही ग्रामीण भागात अनेक प्रश्न उपस्थित होतात. यात पुर्णपणे लॉकडाऊन केल्याने मात्र जनता जास्तच घाबरलेली दिसून येत आहे. आ सुरेश धस हे तुमच्या अडचणीवर लक्ष ठेवून आहेत. तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्ही धीर धरा स्वतःच्या सह कुटुबांची काळजी घ्या. तातडीची अडचण उद्भवली तर संपर्क करा तुमची आडचण सोडवण्यासाठी आ. सुरेश धस मित्र मंडळ आपल्या सेवेत तत्पर आहे असे आवाहन माऊली जरांगे यांनी केले आहे.
Leave a comment