किल्लेधारुर । वार्ताहर
धारुर ग्रामीण रुग्णालय आयुष विभाग व डॉ. सतीश वारे, सुषमा क्लिनिक बीड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.22) कोविड योध्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य प्रशासन, पोलिस प्रशासन, नगर परिषद प्रशासन व पत्रकारांसाठी कोविड 19 च्या अनुषंगाने होमिओपथी शिबिर घेण्यात आले
कोविड 19 प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषधी अर्सेनिक अल्बम हे औषध रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास अत्यंत उपयोगी सिध्द होत आहे. राज्यात सध्या कोविड 19 ने धुमाकुळ घातला आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी, पदाधिकारी व पत्रकार जिवाची पर्वा न करता विशेष परिश्रम घेत आहेत. या सर्वांच्या रोग प्रतिकारशक्ती वृध्दीसाठी ग्रामीण रुग्णालय आयुष विभाग व डॉ. सतीश वारे, सुषमा क्लिनिक बीड यांच्या वतीने होमिओप:थिक शिबिर आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सोशल डिस्टंटींगचे नियम पाळून घेण्यात आले तपासणी साठी सर्व विभागाना वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या होत्या त्या वेळेनुसार आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे ,वैद्यकिय अधिक्षक डॉ. चेतन अदमाने, आयुष विभाग प्रमुख डॉ. शेख परवेज व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Leave a comment