माजलगाव । वार्ताहर
भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात कोरोनाच्या उपाययोजनेत राज्य सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात वेगवेगळे फलक दाखवून व घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
देशात इत्तर राज्यातील सरकारांनी आपापल्या राज्यातील जनतेसाठी केंद्र शासनव्यतिरिक्त वेगळे पॅकेज दिले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी, असंघटित कामगार, बारा बलोतेदार व हातावर पोट असलेल्या जनतेसाठी पन्नास हजार कोटींचे पॅकेज द्यावे. पोलिसांवर व कोरोना योद्यांवर होत असलेले हल्ले तात्काळ बंद करावेत, माजलगाव नगर परिषेदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देऊन माजलगाव शहर स्वच्छ करून शहरातील प्रलंबित कामे पूर्ण करावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी तालुकाध्यक्ष अरुण राऊत, अॅड. सुरेश दळवे, विनायक रत्नपारखी,दत्ता महाजन, ज्ञानेश्वर सरवदे सोमेश दहिवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरा समोरील अंगणात सोशल डिस्टनसिंग चे पालन करत आपापल्या कुटुंबासोबत महाराष्ट्र बचाव आंदोलन करून महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
Leave a comment