बीड । वार्ताहर
राज्यसरकारच्या विरोधात शुक्रवारी बीड येथे संघर्षयोध्दा-भाजपा संपर्क कार्यालयासमोर बीड भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टंसिंगचे पालन करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आ.आदिनाथराव नवले पाटील, जेष्ठ नेते विजयकुमार पालसिंगनकर, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा डॉ जयश्रीताई मुंडे, विक्रांत हाजारी, डॉ लक्ष्मण जाधव, अॅड संगिता धसे, संध्या राजपुत, सचिन उबाळे, विलास बामणे, बालाजी पवार,शांतीनाथ डोरले, अमोल वडतिले,स्वप्निल कुलकर्णी, जालिंदर धांडे, भालचंद्र कुलकर्णी, दत्ता परळकर, बंडू मस्के,शरद बडगे, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ,प्रणव परदेशी, अविनाश नवले व आदी उपस्थित होते.भाजपा प्रमुख पदाधिकारी व अनेक कार्यकर्त्यंनी आपल्या घराच्या अंगणात राज्य सरकारचा निषेध व्यक्त करून महाराष्ट्र बचाव या आंदोलनात सहभागी झाले होते.याप्रसंगी मस्के म्हणाले, देशातील अनेक राज्य सर्व ताकदीनिशी कोरोना विरोधात लढा देत असताना महाराष्ट्रातील सरकार मात्र या लढ्यात अकार्यक्षम ठरले आहे. नियोजनातील अभाव आणि हलगर्जीपणामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले. राज्याच्या ग्रामीण भागातही कोरोना महामारीचा कहर सुरू झाला. सरकार आणि यंत्रणेतील बेबनावा मुळे जनतेचे हाल होत आहेत. ठाणे सारख्या प्रगत शहरांमध्ये उपचाराअभावी कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू होतो ही बाब राज्यासाठी लांच्छनास्पद आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयाची अवस्था काय असेल असा सवाल मस्के यांनी केले.
Leave a comment