बीड । वार्ताहर
कोरोनामूळे देशभरात लॉकडाऊन झाल्यामूळे बीड जिल्ह्यातही बाहेरील अनेक लोक अडकून पडले.त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी संतोष सोहनी यांनी मदतीला धावत आपल्या एमआएडीसी भागातील वैष्णो पैलेस मंगल कार्यालयात अन्नदानाचा महायज्ञच सुरु केला. गेल्या 57 दिवसांपासून हा अन्नदानाचा महायज्ञ अखंडितपणे सुरू आहे. याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते संतोष सोहनी यांनी आज पर्यंत जवळपास 1000 कुटुंबीयांना दोन ते तीन महिने पुरेल असे किराणा किट देऊन गरजवंत कुटुंबीयांना आधार दिला आहे. माता वैष्णो देवीचे आशीर्वाद आणि मित्रपरिवार व जिल्ह्यातील व्यापारी बांधवांची खंबीर साथ यामुळेच हे कार्य घडू शकले असे प्रतिपादन संतोष सोहनी यांनी केले आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बीड शहरामध्ये विविध ठिकाणी अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले होते. या कक्षांमध्ये सुमारे 550 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. लहान मुलांसह आबालवृद्ध या अलगीकरण कक्षात राहत असताना त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी संतोष सोहनी यांनी काही मित्र परिवाराला सोबत घेत अन्नदानाचा यज्ञ सुरू केला. सकाळचा नास्ता, दोन वेळचे जेवण, टरबुज, खरबुज, मोसंबी, फरसाण आणि केळी आदी सकस आहाराचा या अन्नदानामध्ये समावेश करण्यात आला. बघता बघता अलगीकरण कक्षातील लोकांबरोबरच निवारा गृहातील बेसहारा बेघर लोकांकरिता सुद्धा जेवणाचे नियोजन करण्यात आले. पोलीस कर्मचारी, विविध परिसरामधील गोरगरीब नागरिक यांनादेखील जेवण देण्याचे नियोजन संतोष सोहनी यांनी आपल्या मित्र परिवारास समोर व्यक्त केले. तेव्हा सर्वांनी खंबीर साथ देण्याचे आश्वासन दिले. आणि अन्नदानाच्या या यज्ञाचे महायज्ञामध्ये रूपांतर झाले. आता पुढेही 31 मे 2020 लॉकडाऊन संपेपर्यंत हा भंडारा सुरु राहणार आहे.
घरच्यापेक्षा उत्तम सोय झाली ही माणुसकी आम्ही कधीही विसरणार नाहीत अश्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत. परजिल्ह्यातील ऊसतोड कामगार आणि मजूरांच्या 128 मुलांना संतोष सोहनी यांनी नवीन कपडेही दिले.सैनीकी शाळा, फूड टेक्नोलॉजी कॉलेज, पाली जिल्हा परिषद शाळा, पॉलिटेक्निक कॉलेज, मूकबधिर विध्यालय, येथे थांबलेल्या लोकांपर्यंत दररोज जेवन पोहच करण्यात आले. परजिल्ह्यातील अडकलेले मजूर मुक्त केले. त्यानंतरही 300 ऊसतोड मजूर, निवारागृहातील 50 व्यक्ती आणि इतर 200 अशा एकूण 550 लोकांना दोन वेळचे मिष्ठान्न भोजन 14 मे पर्यंत वाटप करण्यात आले. त्यानंतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर करण्यात आला. दरम्यान हाताला काम नसलेले जवळपास 350 नागरिक या अन्नदानावर अवलंबून असल्याचे संतोष सोहनी यांच्या लक्षात आल्यानंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही अन्नदानाचा हा महायज्ञ सुरू ठेवण्याचे ठरविण्यात आले. आजही शहरातील सुमारे 350 नागरिक या अन्नदानाच्या महायज्ञाचा लाभ घेत आहेत.
व्यापारी, मित्र परिवारासह ज्येष्ठांची साथ-संतोष सोहनी
अन्नदानाच्या या महायज्ञात मला अनेकांची साथ मिळत आहे त्यामूळे मी अन्नदानाचे हे महान कार्य करु शकलो असे संतोष सोहनी सांगतात. बीड जिल्ह्यातील व शहरातील व्यापारी वर्ग, तहसीलदार किरण आंबेकर,पोलीस प्रशासन, जैन समाज, माहेश्वरी समाज, राजस्थानी सेवा समाजाचे शिक्षक वृंद, कुटे ग्रुप अन्न व औषध प्रशासन, बीड शहर व्यापारी महासंघ अध्यक्ष विनोद पिंगळे यांची मोलाची साथ मिळाली. अन्नदानाचा हा उपक्रम बघण्यासाठी आलेल्या माजी प्राचार्य प्रभाकरराव महाजन आणि सेवानिवृत्त शिक्षिका नलिनी देशपांडे यांनीदेखील या अन्नदानाच्या महायज्ञास उस्फूर्तपणे पाठिंबा देत प्रत्येकी 25 हजारांची रुपयांची मदत दिली असल्याचे संतोष सोहनी यांनी यावेळी सांगितले.
1 हजार कुटुंबाला दिले किराणा सामान
एकीकडे अन्नदानाचा हा महायज्ञ सुरू असतानाच संतोष सोहनी यांनी बीड शहरातील 1000 गरजवंत कुटुंबीयांना दोन ते तीन महिना पुरेल एवढे किराणा सामान वाटप केले आहे. ज्या गरजवंतांना हे सामान मिळाले त्यांनी संतोष सोहनी यांचे त्रिवार आभार मानले.
संतोष सोहनी आमचेच
बीड शहरातील ज्या गरजवंत कुटुंबांना दोन ते तीन महिने पुरेल एवढे किराणा सामान देण्यात आले. त्यांनी संतोष सोहनी हे आमच्याच परिवारातील सदस्य आहेत, आमचे मोठे बंधू आहेत अशा भावना व्यक्त करून संतोष सोहनी यांच्याशी आत्मिक जवळीकता असल्याचे बोलून दाखविले.
वाहनचालकांनाही दिले मिष्ठान्न भोजन
लॉकडाऊनच्या काळात बीड शहरात संचारबंदी सुरू असताना अन्नाचा घासच काय तर पाणीदेखील कोठेही मिळत नव्हते अशा काळात शहरातील मोंढा परिसरात आणि एमआयडीसी भागात येणार्या वाहनांच्या प्रत्येक चालक आणि वाहकाला वेळोवेळी मिष्ठान्न जेवण देण्याचे काम संतोष सोहनी यांनी केल्याने लॉकडाऊनमध्ये या वाहनचालकांची भूक भागविण्याचे काम याच अन्नदानाच्या महायज्ञातून झाले आहे.
Leave a comment