आष्टी । वार्ताहर
कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाआघाडी सरकार हे सपशेल अपयशी ठरले आहे. हे सरकार फक्त केंद्रसरकारच्या निधीकडे पाहत आहे.आपले स्वतःचे सर्वसामान्य जनतेसाठी विशेष पकेज घोषीत करीत नाही.ऊठसुठ केंद्रसरकारकडे बोट दाखवुन बोटे चेपण्याचीच भूमिका घेत आहे असे सांगत माजी आ.भीमराव धोंडे यांनी राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
राज्य सरकारने गोरगरीब गरजु लोकांसाठी स्वतंञरित्या आर्थिक पकेज जाहिर करावे ही आमची गेली महिन्याभराची मागणी आहे.अद्याप ही मागणी राज्यसरकारने मान्य केलेली नाही. केवळ केंद्रसरकारच्या निधीवर अवलंबुन राहुन चालणार नाही असे मत भीमराव धोंडे यांनी व्यक्त केले.ते म्हणाले की,सरकार व प्रशासनातील अधिका-यांमध्ये सुसंवाद नाही. सरकारचे मंञ्यांना ग्राऊंड रिअलीटीचा अभ्यास नाही.कोरोनासारख्या महामारीचे संकट हाताळण्यास महाआघाडीला अपयश येत आहे. राज्याची परिस्थीती हाताबाहेर जात असल्याचा आरोप भाजपाचे आ.भीमराव धोंडे यांनी यावेळी केला.याप्रसंगी वाल्मिक निकाळजे,बबन झांबरे ,अॅड.साहेबराव म्हस्के ,लालाभाऊ कुमकर ,ड.रत्नदीप निकाळजे, बाबुशेठ भंडारी,राजेंद्र धोंडे ,अभय धोंडे ,अजय धोंडे ,रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, हनुमंत थोरवे ,सरपंच संतोषचव्हाण ,बाजीराव वाल्हेकर,बाबु कदम,जाकीर कुरेशी,तात्या कदम,शंकर देशमुख,संभाजी जगताप,लक्ष्मण उकले आदि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a comment