एकेमकांशी संवाद साधण्यात मश्गुल-आ.सुरेश धस
आष्टी । वार्ताहर
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असून हे महाविकास नाही तर महागोतावळा आघाडीचे सरकार असून यांच्या विरोधात विरोधकांनी काही बोलले अथवा काही सुचना केल्या की त्यांना ट्रोल करणे आणि केवळ फेसबुकच्या माध्यमातून परिस्थीती कशी नियंत्रणात आहे आणि यावर फेसबुकच्याच माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्यात हे सरकारचे मंञी मशगुल असून यांना ग्राऊंड रिअलीटीचा शुन्य अभ्यास असल्याने परिस्थीती हाताबाहेर जात असल्याचा आरोप भाजपाचे आ.सुरेश धस यांनी केला.
भाजपाने राज्यभर पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव अंदोलनात भाजपाचे आ.सुरेश धस व भाजपाचे माजी आ.भिमराव धोंडे या दोन्ही भाजपा नेत्यांनी आप-आपल्या घरासमोरील अंगणात सोशल फिजिकल डिस्टंन्स पाळत अंदोलन केले.विशेष म्हणजे यावेळी आ.धस यांचे कुटुंब या आंदोलनात सहभागी झाले होते. कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनात व समन्वयात पुर्णपणे अभाव राहिला आहे.महाराष्ट्रातील महाविकास अघाडी सरकार हे कोविड 19 पादुर्भाव रोखण्यासाठी पुर्णपणे अपयशी ठरले आहे.याप्रश्नी राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी संपूर्ण राज्यात भाजपाच्यावतीने अंदोलन करण्यात येत आहे.दरम्यान आष्टी येथील विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस यांनी आपल्या निवासस्थासमोर काळे मास्क लावून डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून सरकारच्या विरोधी घोषणा देत हातात मागण्यांचे फलक घेऊन सकाळी 11 ते 11.30 पर्यंत अंदोलन केले.तर भाजपाचे माजी आ.भिमराव धोंडे यांनी ही आपल्या घरासमोर कार्येकर्त्यांच्या उपस्थितीत हातात काळे झेंडे घेऊन आंदोलन केले.
Leave a comment