शिरूर कासार । वार्ताहर
शिरूर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र नसल्यामुळे अनेक शेतकर्यांनी आपला कापूस खासगी व्यापार्यांच्या घशात कवडीमोल किमतीने घातलेला आहे.अजूनही काही शेतकर्यांकडे कापूस असून कापूस खरेदी केंद्राचा प्रश्न मार्गी लागणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
शिरूर तालुक्यातील शेतकर्यांनी कापूस खरेदी केंद्र नसल्यामुळे व्यापार्यांना मनमानी भावानुसार विकलेला आहे. लॉक डाऊन झाल्यानंतरही बर्याच शेतकर्यांकडे कापूस शिल्लक होता. रास्त भाव मिळण्यासाठी अनेक शेतकरी कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत होते. शिरूर तालुक्यातील शेतकर्यांसाठी कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी दिनांक 9 मार्च 2020 रोजी बाळासाहेब नागरे आणि अन्य शेतकर्यांनी केली होती.कापूस खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने तसेच शेतकर्यानी बीड आणि अन्य ठिकाणच्या शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे नोंदणी न केल्यामुळे नाविलाजाने खाजगी व्यापार्यास कापूस विकला आहे. अजूनही काही शेतकर्यांकडे कापूस शिल्लक असून कापूस खरेदी केंद्र नसल्यामुळे व्यापारी वर्ग शेतकर्यांकडून मनमानी किमतीत कापूस खरेदी करत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच उत्पादन कमी झालेल्या शेतकरीवर्गास व्यापारी लुटत आहेत. कापूस खरेदी केंद्रास उशीर होत असल्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी सुद्धा खासगी व्यापार्यांना कापूस विक्री करताना दिसत आहेत.दरम्यान याबाबत बाळासाहेब नागरे म्हणाले, शेतकर्याच्या कापसाकड कुणाच लक्ष नाही. प्रत्येक तालुक्यात जिनींगवर कापूस खरेदी करावा.जिल्हयातील सर्व नेत्यांना विनंती की कापूस खरेदी संदर्भात पाऊसाचे दिवस जवळ आल्यामुळे लक्ष घालावे.
Leave a comment