आ.लक्ष्मण पवारांची जिल्हाधिका-याकडे मागणी
गेवराई : वार्ताहर
देशात कोरोनो नावांच्या विषाणूचा पादुर्वभाव वाढत आहे त्यातच शेतक-यांच्या पिकाला मार्केट मिळत नाही त्यामुळे आगोदरच शेतकरी संकटात सापडला आहे त्यातच शेतक-यांना वेगवेगळे अनुदान सरकारने दिले आहे. अनेक शेतक-यांच्या ऑकाऊटला बॅंकाने होल्ड लावल्यामुळे शेतक-यांना खात्यावरील पैसे मिळत नाही म्हणून शेतकरी आज अडचणीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत बॅकाना सूचना देण्यात येऊन शेतक-यांना खात्यावर पैसे देण्याची सूचना करावी अशी मागणी आ. लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात आ. पवार म्हणाले की काही दिवसावर खरिप हंगामा सुरू होत अशा वेळी शेतक-यांना बि बियाणे शेतीची औजारे घेण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे तसेच पण राष्ट्रीयकृत बॅंकाने शेतक-यांच्या खात्यावर होल्ड लावला आसल्याने विविध योजना व अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा आहे पण खात्यावर होल्ड असल्याने शेतक-यांना पैसे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे तरी जिल्हाधिकारी यांनी लक्ष लाॅकडाऊनच्या काळात तरी शेतक-यांच्या अडचणी समजून घेऊन मार्गी लावण्यासाठी संबंधित बॅंकेला सूचना द्यावी अशी मागणी आ. लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे
Leave a comment