बीड । वार्ताहर
जिल्ह्यात उपचार घेणार्या एकुण बाधित रुग्णांची संख्या 29 झालेली आहे. शुक्रवारी (दि.22) एकुण 42 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान गुरुवारी पाठवलेले 35 पैकी 32 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 3 प्रलंबित आहेत.
यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयातून 20, केजमधून 7 तसेच माजलगावमधून 14 तर आष्टी येथून एका व्यक्तीच्या स्वॅबचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात आजपर्यंत 37 बाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 6 जण पुणे येथेने स्वेच्छेने उपचारासाठी रवाना झाले. तर एका रुग्णाचा मृत्यू व एक कोरोनामुक्त झालेला असून 29 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. या रुग्णांना वेळेवर औषधी तसेच योग्य भोजन तसेच सोयीसुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अधिक लक्ष दिले जात आहे. रुग्णांना दिल्या जाणार्या आहाराचे तसेच स्वच्छतेबाबतचे छायाचित्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सकाळी पाठवण्यात आले.
Leave a comment