किल्लेधारूर । वार्ताहर
आत्ता पर्यंत तालुक्यात 9 स्वॅब पाठवले आहेत 7 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत तर 1 रुग्णाला लागण झाल्याचे दिसून आले तर 1 रुग्णाचा रिपोर्ट प्रतीक्षेत आहे
कोरोना सारख्या महारोगाने अख्या जगामध्ये थैमान घातले असता भारत देशात सुद्धा या रोगाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले आहे यातच मुंबई-पुणे औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात याचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे शहरातून ग्रामीण भागात येणार्यांची संख्या जास्त आहे व वाढत च आहे याची खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार किल्ले धारूर तालुक्यात 1746 व्यक्ती परराज्यातून तसेच मोठ्या शहरातून आले आहेत या सर्व व्यक्तींना आरोग्य विभागाने तपासण्या करून होम क्वारंटाईन केले आहे.
मुंबई पुणे औरंगाबाद सह परराज्यातून बीडमध्ये येणार्यांची संख्या वाढत चाललेली असून यात रुग्णांची संख्येत सुद्धा वाढ होत चाललेली आहे याची मोठी चिंता आरोग्य विभागाला आहे याची खबरदारी म्हणून आरोग्य प्रशासनाने बाहेरून येणार्या नागरिकांना तपासणी करून होम क्वारंटाईन करत आहेत यातच बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव गेवराई तसेच आष्टी तालुक्यात कोरोना रुग्णाचा शिरकाव झाल्याने मोठी चिंतेची बाब आहे किल्ले धारूर शहरात या तालुक्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर किल्ले धारूर तालुक्यामधून आतापर्यंत 9 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत तर 7 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत तर तालुक्यातील कुंडी गावातील 1 रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे चित्र स्पष्ट झाले तर 1 रुग्णाचा बोडखा गावातील अहवाल प्रतीक्षेत आहे.
Leave a comment