धोंडराई \ वार्ताहर
संपूर्ण देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने राज्यात व त्यानंतर ग्रीन झोनकडे वाटचाल करणाऱ्या बीड जिल्ह्यातील बऱ्याचशा तालुक्यांमध्ये प्रवेश केला आहे . जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तरी लोक घरात राहतील काळजी घेतील असे वाटतं होते परंतु धोंडराईकरांना याचे गांभीर्य लक्षातच येत नाहीये धोंडराई मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असल्यामुळे धोंडराई परिसरातील गौंडगाव ,भोजगाव , तळणेवाडी ,गंगावाडी ,कोमलवाडी आदी गावातील लोक बॅंकेच्या व्यवहारासाठी धोंडराई गावात येत असतात मात्र येताना ते सोशल डिस्टंट किंवा फिजीकल डिस्टंट चे सर्व नियम धाब्यावर बसवत येतात तर गावातील लोकदेखील काम नसताना विनाकारण बसस्थानक परिसरात गर्दी करताना दिसत आहेत व धोंडराईमध्ये औरंगाबाद, पुणे, मुंबई अशाच बाहेर गावाहून येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गावातील लोकांनी गर्दी न करता कामानिमित्तच बाहेर निघून प्रशासनास सहकार्य करुन आपल्यासह आरोग्याची व स्वता:ची काळजी घ्यावी ..
Leave a comment