एसपींचे जिल्हाधिकार्यांना पत्र, सीइओंच्या बीईओंना सूचना
बीड । वार्ताहर
कोरोनाची बाधितांची संख्या बीड जिल्ह्यात वाढत आहे. कंटेनमेंट झोमनमध्ये संचारबंदीच्या अंमलबजावणीस आता पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत आहे.त्यामुळे शिक्षकांना बंदोबस्तावर तैनात केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी जिल्हाधिकार्यांना पोलिसांच्या अपुर्या बळाबाबत पत्र पाठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. बीड शहरासह, गेवराई, केज, माजलगाव, धारुर, आष्टी, पाटोदा या तालुक्यांत रुग्ण सापडले आहेत. ज्या गावात रुग्ण सापडतो त्याच्या तीन किलोमिटरचा परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केला जातो. इथे पूर्णवेळ संचारबंदी असते. या गावांत कुणाला प्रवेश देता येत नाही की गावातून कुणी बाहेर जात नाही. याची अंमलबजावणी पोलिस विभागाकडून केली जाते. यासाठी नाकाबंदी, फिक्स पॉइंट लावले जातात. मात्र, जिल्ह्यात पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. यासाठी एसपी पोद्दार यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवले होते. जिल्हाधिकार्यांच्या सूचनेवरुन सीइओ अजित कुंभार यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्यांना पत्र पाठवले असून 27 पोलिस ठाण्यात 330 शिक्षकांना बंदोबस्त काम नेमले जाणार आहे.
Leave a comment