बीड । वार्ताहर
जिल्ह्यात गत पाच दिवसात एकुण उपचार घेणार्या बाधित रुग्णांची संख्या 29 झालेली असताना गुरुवारी (दि.21) तपासणीला पाठवलेल्या 35 पैकी 32 रुग्णांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती दिली.अन्य तिघांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.
बुधवारी बीड जिल्ह्यातील 113 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. त्यातील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 90 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.याबरोबरच 13 अहवाल प्रलंबित राहिले होते तर 6 जणांच्या अहवालाचा कोणताही निष्कर्ष निघाला नव्हता.
त्यानंतर गुरुवारी दुपारी प्रलंबित 13 स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण बाधीत रुग्णांची संख्या 29 झाली आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी लातूर येथील विलासराव शासकीय विज्ञान वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवलेले 35 पैकी 32 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे चिंताग्रस्त बीड जिल्ह्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
Leave a comment