गेवराई । वार्ताहर
काँग्रेस पक्षाने 2019 या लोकसभा निवडणुकीत या योजनेचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिले होते वार्षिक उत्पन्न 1 लाख 44 हजारांपेक्षा कमी असलेल्या सर्व कुटुंबांना काँग्रेस सरकारकडून दरमहा सहा हजार रुपये (200रु.प्रतिदिन) थेट बँक खात्यात जमा होतील अशी योजना होती. कुटुंबातल्या महिलेच्या खात्यात ही रक्कम जमा होईल जेणेकरून या पैशांचा दुरुपयोग होणार नाही अशी तरतूद या योजनेमध्ये होती मात्र केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार न आल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
गरजूंना मिळणारे पैसे जीवनावश्यक वस्तूवर खर्च होणार त्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल मागणी वाढली की उत्पादन वाढवावे लागेल त्यासाठी जास्त कामगारांची गरज लागेल मिळालेल्या पगारातून कामगार आणखी खर्च करतील मागणी आणखी वाढेल आणि परत रोजगाराच्या जास्त संधी निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल.न्याय योजनेचे फायदे होते मात्र दुर्देवाने या योजनेच्या अंमलबजावणी होऊ शकली नाही. सध्या कोरोनाच्या संकटामध्ये संपूर्ण देश होरपळून निघाला असताना आरोग्य आणि अर्थव्यवस्था मोठ्या संकटांचा सामना करत आहे देशाचे नेते राहुल जी गांधी सातत्याने केंद्र शासनाकडे न्याय सारखी योजना सुरू करण्याबाबत मागणी करत आहे गरजू कुटुंबियांच्या बँक खात्यामध्ये महिना 6 हजार रुपये(200 रु. प्रतिदिन) जमा करावे जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल आणि अर्थव्यवस्थालाही चालना मिळेल. आज माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव जी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्हा युवक काँग्रेस केंद्र सरकारकडे मागणी करते की तातडीने पुढील सहा महिन्यांसाठी अशी एखादी योजना सुरू करावी व गरजूंना न्याय देण्याचे काम करावे.अशा योजनेच्या तुमच्या जीवनात काय फरक पडू शकतो याचा एक दिवसाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने आज गेवराई शहरातील गरजू कुटुंबातल्या महिलेना बीड जिल्हा युवक काँगेस च्या वतीने रुपये 200 देण्यात आले,या वेळी उपस्तीत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे,किरण अजबकर,बळीराम गिराम, गोटू सावंत आदी दिसत आहेत.
Leave a comment