केज । वार्ताहर
लॉक डाऊनमुळे केज-कळंब दरम्यानच्या महामार्गावर काम करणारे झारखंड मजूर अडकून पडले होते. निवासी जिल्हाधिकारी एस एस गायकवाड यांच्या अमूल्य मदतीमुळे आज मोफत एस.टी.बसने औरंगाबाद येथे रवाना करण्यात आले तिथून पुढचा प्रवास ते रेल्वेने करणार आहेत.
केज.कळंब दरम्यान सुरू असलेल्या महामार्गावरील पुलाच्या कामावर काम करणारे झारखंड राज्यातील मजूर हे लॉकडाउनमुळे अडकून पडले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या गावी जाता येत नव्हते व त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. पत्रकार गौतम बचुटे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व निवासी जिल्हाधिकारी एस एस गायकवाड यांना तहसीलदार मेंढके यांच्या द्वारे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्याद्वारे त्यांची सर्व माहिती कळविली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावर, निवासी जिल्हाधिकारी एस. एस. गायकवाड यांना कळविली. त्या नंतर तहसील कार्यालयातील लिपिक धुमक व केज पोलीस स्टेशनचे सय्यद मतीन यांनी त्यांचा पाठपुरावा केला. त्या नंतर निवासी जिल्हाधिकारी एस. एस. गायकवाड यांनी त्यांना प्रस्ताव तयार करून त्यांना औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन पर्यंत एसटी बसने सोडण्याची व्यवस्था केली. तसेच प्रवासा अगोदर त्यांची उपजिल्हा रुग्णालचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष मुळे, आणि त्यांचे सहकारी वसंत बापू काळे, सचिन चाळके, रत्नदीप चाटे, एस टी चे महामंडळ धारूर आगराचे बिक्कड साहेब, चालक सुनिल सिरसट, सपोउनि महादेव गुजर, मधुकर रोडे, प्रेमचंद वंजारे, मंगेश भोले, सतीश बनसोडे हे उपस्थित होते. यावेळी सर्व मजूर भावुक झाले आणि त्यांनी दोन महिन्या पासून येथील सर्व दानशूर लोकांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पोहोचल्यास त्यांना झारखंडकडे जाणार्या रेल्वेत बसविण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी एस. एस. गायकवाड यांच्या आदेशानुसार औरंगाबाद येथील उपजिल्हाधिकारी बाणापुरे यांनी त्यांना मदत केली. उपजिल्हाधिकारी बाणापुरे यांनी स्वतः औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन वरून त्यांची झारखंड राज्यतील गढवा जिल्ह्यापर्यंत जाण्यासाठी रेल्वचे अधिकारी यांना भेटून त्यांची व्यवस्था केली. मागील दोन महिन्यांपासून काम बंद असतानाही या मजुरांना केज तालुक्यातील अनेकांनी अन्नधान्य किराणा सामान आणि इतर मदत केली. संकिंदर कुमार, शैलेश आणि त्यांच्या सहकार्यांच्या कुटुंबीयांनी मदती बद्दल फोनवरुन महाराष्ट्रातील सर्वांचे कौतुक केले आणि आभार व्यक्त करताना ते भावुक झाले.
Leave a comment