गेवराई । वार्ताहर

कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणी सापडला आहे.कापूस, तूर हरभरा शेतमालाची जादा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावीत आणि बंद करण्यात आलेली ऑनलाईन नोंदी तात्काळ सुरु करावी, या मागणीसाठी आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई तहसिल कार्यालयासमोर गुरुवारी (दि.1) रोजी भर उन्हात लाक्षणिक उपोषण केले. खरेदी केंद्राची संख्या वाढवण्यात येईल,असे अश्‍वासन ना.तहसिलदार प्रशांत जधवर यांनी प्रशासनाकडून देण्यात आल्याने आमदार पवारांनी उपोषण मागे घेतले आहे. 

गेवराई तालुक्यात कोरोना मुळे 24 मार्च पासून  लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार बंद होते.शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस, तूर हरभरा हा माल लाँकडाऊन असल्याने विक्री करता आला नाही. शिवाय दोन महिने शासकीय खरेदी केंद्र बंद होती. यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत आल्याने   नव्याने नोंदीसह कापूस, तूर, हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावेत या मागणीसाठी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी थेट उपोषणाचं अस्त्र उगारले. गुरुवारी सकाळपासूनच तहसील कार्यालयासमोर तोंडाला मास्क बांधून आ.पवार हे उपोषणाला बसले.

शासकीय नव्याने नोंदीसह कापूस, तुर व हरभरा केंद्र सुरू करण्यात यावे अशा आशयाची मागणी 14 मे रोजी आ.लक्ष्मण पवार यांची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली होती. त्याबरोबर उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर गुरूवारी आ. पवार यांनी तहसील समोर उपोषण सुरू केले. उप विभागिय अधिकारी यांनी आ.पवार यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून प्रश्‍न मार्गी लावण्याचे अश्‍वासन दिले. यानंतर वरीष्ठाच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी लेखी अश्‍वासन दिले. यावेळी दिपक सुरवसे, संदिप लगड, सुशिल जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, दादासाहेब गिरी, राजेंद्र भंडारी, ब्रह्मदेव धुरंधरे, विठ्ठल मोटे, सतिश दाभाडे, ईश्‍वर पवार, नगरसेवक छगनअप्पा हादगुले, भगवानराव घुबार्डे, संजय इंगळे,भरत गायकवाड, किशोर धोडलकर आदींची उपिस्थती होती. या सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळून उपोषण केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.