बीड । वार्ताहर
जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, बीड, धारुर तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. ज्या गावात रुग्ण सापडले तेथील कंटेटमेन्ट भागातील गावांमध्ये आरोग्य सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. तर परजिल्ह्यातून येणार्यांना होम क्वॉरंटाईन केले जात आहे. गुरुवारपर्यंत (दि.21) जिल्ह्यात 9 हजार 399 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून 20 जणांचे संस्थात्मक अलगीकरण केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 47 हजार 136 ऊसतोड मजुरांना प्रवेश देण्यात आला आहे.
इटकुर (ता.गेवराई) परिसरातील 7 गावांमध्ये 1275 घरामधील 4740 नागरिकांचा, हिवरा (ता) माजलगाव पसिरातील 5 गावांच्या 818 घरामधील 3397, याच तालुक्यातील कवडगावथडी परिसरातील 7 गावच्या 1076 घरांमधील 5096 नागरिकांचे आरोग्य विभागाच्या स्वतंत्र टिमकडून सर्व्हेक्षण केले गेले आहे. याशिवाय पाटण सांगवी (ता.आष्टी) पसिरातील 5 गावांमधील 1276 घरातील 6271, चंदन सावरगाव (ता.केज) परिसरातील 4 गावच्या 1349 घरातील 8730, याच तालुक्यातील केळगाव कंटेन्मेंट झोनमधील 5 गावच्या 1276 घरातील 6835 नागरिकांचा सर्वे झाला आहे. बीड शहरातील मोमीनपुरा कंटेन्मेंट झोनमध्ये 173 घरांमधील 1028 नागरिकांचा तर जयभवानीनगरमधील 98 घरांमध्ये 455 नागरिकांचा सर्व्हे झाला. वडवणी शहराच्या येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 388 घरांमध्ये 2853 नागरिकांचा तर पाटोदा शहरातील 2710 घरांमध्ये 19 हजार 700 नागरिकांचा सर्वे केला गेला. पाटोदा तालुक्यातील वहाली परिसरातील 5 गावच्या 804 घरामध्ये 3560 नागरिकांचा सर्वे झाला असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Leave a comment