बाहेर जिल्ह्यातून आलेल्याचा मुक्तसंचार
शिरुरकासार । वार्ताहर
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत. सुज्ञ नागरिक गांभीर्य राखून सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आहेत. कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात कोरोना व्हायरसचा खडा पहारा असला तरी बाहेर जिल्हयातून आलेले नागरिक गांभीर्य विसरून मुक्त संचार करत आहेत. छुप्या मार्गाने रेडझोनमधून आलेल्या नागरिकांमुळे शहरातील व तालुक्यातील इतर नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असली तरी निवडणुकीवर डोळा ठेऊन नगरपंचायत पदाधिकार्यांनी मात्र या गंभीर बाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
कोरोना विषाणूची संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. शासन,प्रशासन स्तरावरून खबरदारीच्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचे गांभीर्य राखून बाहेर जिल्ह्यातून खास करून मुंबई, पुणे येथून शहरात आलेल्या नागरिकांवर अशा, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी नजर ठेवून आहेत.याशिवाय छुप्या पद्धतीने शहरात, गावात प्रवेश करणार्या नागरिकांवर वाच ठेवण्यासाठी गावपातळीवर अँटी कोरोना टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात बाहेर जिल्ह्यातून येणार्या नागरिकांवर नजर ठेवून त्यांना वेळीच क्वारांटाईंन करण्यासाठी प्रभाग निहाय 17 अँटी कोरोना टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये ज्या-त्या प्रभागाच्या नगरसेवकाची प्रमुख जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या आदेशाने लॉकडाऊन कालावधीत सुरळीत जीवनमान चालावे या उद्देशाने दिवसाआड काही निर्बंध लागू करून सवलत जारी करण्यात आली असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्स, मास्क,सॅनेटाईझ अशा अत्यंत महत्वाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मागील आठवड्या पासून शहरात बाहेर जिल्ह्यातून खास करून मुंबई , पुणे येथून नागरिकांचे लोंढे दाखल होत आहेत. रेडझोन जिल्ह्यातून शहरात छुप्या मार्गाने दाखल होणार्या नागरिकांच्या कुटुंबियांशी हित संबंध राखण्यासाठी स्थानिक पदाधिकार्यांकडून त्याची ट्रॅव्हल हिट्री दडवण्यात येत असल्याच्या धक्कादायक चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. शिरूर तुलुक्याच्या चोहो बाजूने कोरोनाणे विळखा घातल्याने शहरासह तालुक्यातील नागरिक पुरता धास्तवला असताना शहरात मात्र निवडणूका डोळ्या समोर ठेऊन हित संबंध जोपासण्यासाठी नगरपंच्यात पदाधिकारी कोरोनाचे गांभीर्य विसरून कर्तव्याला सोयीस्कर बगल देत आहेत.
गल्ली बोळा धास्तावल्या
रेडझोन जिल्ह्यातून छुप्या मार्गाने शहरात आलेल्या नागरिकांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गल्ली बोळात क्वॉरनटाईन शिवाय वावरणार्यां विषयी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत.
प्रशासनाला सहकार्य करा!
कोरोना बाधित क्षेत्रांतून शहरात, तालुक्यात आलेल्या नागरिकांनी स्वतःची माहिती स्वतःहून द्यावी मग तो नातेवाईक असो वा स्वतःचा मुलगा असो त्याला घरात न घेता विलगीकरण कक्षामध्ये कॉरनटाईन ठेवावे.त्यामुळे स्वतःसह संपूर्ण परिसर सुरक्षित राहील प्रत्येकाने हि जबाबदारी समजून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार श्रीराम भेंडे
Leave a comment