जिल्हातंर्गत बस सेवा सुरु
बीड | वार्ताहर
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे मार्चपासून आगारात उभी असणारी लालपरी आता जवळपास दोन महिन्यानंतर गती पकडणार आहे. आजपासून दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्येक आगारातून 12 बस फेऱ्या होणार आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार नॉन रेड जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा आजपासून (दि.22) सुरू होत आहे. बसच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के म्हणजेच 22 प्रवासी महामंडळाच्या बसमधून प्रवास करू शकणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली.गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटी बसेस आगारात उभ्या करण्याची वेळ आली होती; मात्र आता राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार आज शुक्रवारपासून जिल्हातंर्गत बस सेवा सुरू होत आहेत. बस आसन क्षमतेच्या 50 टक्के म्हणजेच 22 प्रवाशांना बसमधून प्रवास करू शकणार आहेत.
*या मार्गावरून होणार दिवसातून 12 फेऱ्या*
सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुढील मार्गावरून धावणाऱ्या बसेस पुढीलप्रमाणे:-
■बीड- परळी
■बीड- अंबाजोगाई ,
■बीड- माजलगाव
■बीड- धारूर,
■बीड- गेवराई
■बीड- पाटोदा
■बीड- आष्टी
■परळी-अंबाजोगाई
■धारूर-अंबाजोगाई
■केज-माजलगाव
■माजलगाव-गेवराई-गढी
काय आहेत अटी-शर्ती?
१. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत हि बस सेवा सुरु राहील.
२. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
३. सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
४. जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )
५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
६. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.
Leave a comment