वडवणी वार्ताहर। सुधाकर पोटभरे
वडवणी शहरातील साळींबा रोड वरील कोर्टासमोरील इमारत जेथे १ कोरोना विषाणू संसर्ग लागन झालेला ६७ वर्षे वयाचा रुग्ण आढळून आला आहे याचा इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रमाणे फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार वडवणी शहरातील साळींबा रोड वरील कोर्टासमोरील इमारत जेथे हा रुग्ण व इतर संशयित व्यक्ती राहात होते. कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या इमारतीच्या सभोवतालचा परिसर बफर झोन (Buffer zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवार दि.२० रोजी रात्री दिले आहेत. राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दि.३१ मे २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ मे २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील. दरम्यान वडवणी शहरातील कन्टेन्मेंट झोनमधील कुटूंबातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी आज सकाळीच आरोग्य प्रशासनाने सुरु केली असून नगर पंचायतकडून सर्व परिसरात फवारणी करण्यात आली आहे. तशेच शहरात प्रत्येक प्रभागातले रस्ते काटयाच्या कुपाट्या लाऊन रस्ते बंद करण्यात आले आहेत विषम तारखेला वडवणी शहरात शिथीलतेचा कालावधी असतांनाही संपूर्ण शहर कडेकोट बंद ठेवण्यात आले. रस्ते निर्मनुष्य होते. अत्यावश्यक सेवा असलेल्या दवाखाना, मेडिकल, किराणा व बँका देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या . रस्त्यावर ठिकठिकाणी व कन्टेन्मेंट झोन परिसरात चोख पोलिस निरीक्षक महेश टाक उपनिरीक्षक परदेशी . उपनिरीक्षक गव्हाणे .पो नााईक मनोज जोगदंड माळी बारगजे शिंदे सह आदी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Leave a comment