रुग्ण माजलगाव, धारूर तालुक्यातील
बाधीत रुग्णापैकी 11 जण नित्रूड (ता.माजलगाव) येथील तर याच तालुक्यातील सुर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
हा रुग्ण कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील आहे,
तर अन्य एक बाधीत रुग्ण कुंडी (ता.धारूर) येथील आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात गत पाच दिवसात एकुण उपचार घेणार्या बाधित रुग्णांची संख्या 16 झालेली असताना आता बुधवारी (दि.20) तपासणीला पाठवलेल्या पण प्रलंबित राहिलेल्या 13 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण बाधितांची संख्या 29 झाली असून यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. दरम्यान गुरुवारी (दि.21) नव्याने आणखी 32 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले आहेत.
बुधवारी बीड जिल्ह्यातील 113 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. त्यातील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 90 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.याबरोबरच 13 अहवाल प्रलंबित राहिले होते तर 6 जणांच्या अहवालाचा कोणताही निष्कर्ष निघाला नव्हता.आता आज गुरुवारी दुपारी कालच्या प्रलंबित 13 स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण बाधीत रुग्णांची संख्या 29 वर पोहचली आहे.
Leave a comment