शेती वर्ग अडचणीत
आष्टी । वार्ताहर
लॉकडाउनमुळे दुधाला मागणी कमी झाल्याने प्रती लिटरमागे सुमारे 12 रुपये दर कमी झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे.आष्टी तालुक्याचा प्रमुख धंदा असलेल्या दूध व्यवसायास यामुळे उतरती कळा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.आजघडीला तालुक्यात जवळपास दीड लाख लिटर दैनंदिन दूध संकलित होत आहे.
तालुक्यातील शेतीला दूध व्यवसायाची बहूतांश शेतकर्यांनी जोड दिलेली आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून दूध व्यवसाय सातत्याने अडचणीत येत असून दराचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जरा बर्यापैकी दर मिळू लागला होता. मात्र कोरोनामुळे पुन्हा दुध व्यवसाय अडचणीत आला आहे. लॉकडाउन होण्याआधी दुधाला साधारण 32 ते 34 रुपये प्रतीलिटर दर मिळत होता. मात्र बाजारात मागणी नसल्याचे कारण पुढे करत दरात मोठी कपात केली. सध्या दुधाला प्रतीलिटर 21 ते 22 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील दुध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे.
Leave a comment