आष्टी । वार्ताहर
समाजप्रबोधन करणे, मार्गदर्शन करणं सोपं असतं पण आपण सांगीतलेलेच विचार आचरणात आणणे हे खुपच अवघड आणि ञासदायक आहे माञ म.फुले,डा.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहु महाराज यांनी आपले विचार कृतीत आणले म्हणुन ते थोर समाजसुधारक झाले. आष्टीचे माजी सरपंच नामदेव राऊतही लाकडाऊन कोरोना व्हायरस काळात शहरातुन गावी परत आलेल्या भूमीहीन, गरीब लोकांच्या व्यथा पाहुन भावूक झाले आहेत. त्यांनी व्हाटस्अपवर आपले विचार लिहले. आपण ग्रामीण भागात राहणार्या लोकांनी शहरातुन कोरोनाच्या भितीने परतलेल्या आणि कामधंद्यासाठी गेलेले आपलेच बांधव आहेत त्यांना आधार द्या, त्यांना तुच्छ लेखु नका, आज त्यांच्यावर वेळ आली... उद्या आपल्यावर वेळ येऊ शकते याचे भान ठेवा असे सांगत मी माझ्या घरापासुन अशा लोकांना आधार व आश्रय देण्याचे काम सुरु करीत आहे असे नामदेव राऊत यांनी मत व्यक्त केले आहे.
राऊत म्हणतात की, मुबंईकर ,ठाणेकर, पुणेकरांनो तुम्ही शहरात गेलात. कुणी नोकरीसाठी, कुणी व्यवसायाचेनिमित्तानं आणि कायमचे शहरी झालात.पण आता वेळ अशी आली शहर असुरक्षीत झालेत.तुमचा तेथे दम तिथे कोंडलाय.काहीची गावाकडं शेती घर आहे. नातेवाईक आहेत
पण काहींचे खेड्यात काहीच नाही. तुम्ही ईकडे आलात तर ईथले काही लोक तुम्हांला तुच्छ लेखायला लागले.तुम्ही जन्मगावी खुशाल या.. आपल्या गावी थोडे काही दिवस लांब रहा, तपासणी करुन घ्या , शासनाचे नियम पाळा,होमक्वारटाईन व्हा. गावक-यांना मदत करा. तुम्ही आमचेच आहात. आमच्यातील दुष्टप्रवृतीचे काही लोक नांव ठेवतील , ठेवु द्या. आज वेळ तुमच्यावर आहे. उद्या तीच वेळ आमच्यावरही येऊ शकते. आपण सर्वजण या महामारीच्या संकटाचा धैर्याने सामना करूयात. ज्यांना राहायला जागा नसेल, त्याना माझेसारखे अनेकजण जागा उपलब्ध करून देतील. या ईकडे खुप रिकामे पटांगण आहे. झोपडी करुन रहा. पण या. माझ्या मनातील भावना,सामाजिक बांधिलकीचे विचार मी व्यक्त केले. आधार देण्याच्या कामाची मी सुरवात करणार...
माझे घर तुम्हाला राहायला देणार..भले तो कोणत्याही जातीधर्मातील माणुस असो आपण सहकार्य करणार.
कोरोना पझीटिव्ह असेल तरी पण माझी जागा, जमीन त्यांना राहण्यास देईल असे आवाह नामदेव राऊत यांनी हाटस्अपवरुन केले आहे. संपर्क मो.9405353599 असा नंबर आहे.
Leave a comment