बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांची कमी करण्यात आलेली उपस्थिती शुक्रवार पासून पूर्ववत करण्यात येणार आहे,बीड जिल्हा परिषदेचे रुटीन कामकाज 100 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अजित कुंभार यांनी दिले आहेत .
मार्च महिन्यात कोरोनाची लागण सुरू झाल्यानंतर शासनाने कार्यालयातील उपस्थिती कमी करून सुरवातीला 10 टक्के अन त्यानंतर 33 टक्के कर्मचार्यांच्या माध्यमातून कामकाज करावे असे म्हटले होते.
दरम्यान 22 मे पासून राज्य सरकारी कार्यालयात कर्मचार्यांच्या उपस्थिती बाबत शासनाचे निर्देश नव्याने आल्यानुसार बीड जिल्हा परिषदेत सर्व विभाग प्रमुखांनी 100 टक्के कर्मचारी कामावर हजर राहतील यासाठी आदेशीत करण्यात आले आहे.त्यामुळे आता शुक्रवार पासून जवळ परिषदेचे कामकाज रुटीन प्रमाणे सुरू होणार आहे.
Leave a comment