'तेरी भी चूप मेरी भी चूप..ग्रामीण भागातील वास्तव
अमोल येवले/ डोंगरकीन्ही
प्रशासना कडे कागदावर 'क्वारंटाईन'असलेल्या लोकांना फिरतांना आडवायाचे कुणी,' नवीन आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी (घरात राहतात का.? खरोखरच क्वारंटाईन आहे का.?) पुढे होऊन ते व्यक्ती अंगावर घ्यायचे कुणी, भांडण तंटे होण्यापेक्षा 'तेरी भी चूप मेरी भी चूप..या नुसार ग्रामीण भागात चित्र पहावयास मिळत आहे. हेच चित्र धोकेदायक ठरू शकते.सध्या जगभर थैमान घालत असलेल्या कोव्हिडं 19 (कोरोना वायरस) चे लोन आता ग्रामीण भागातील खेडो पाडी पोहचले आहे.प्रशासनाच्या वतीने बाहेरून येणाऱ्या लोकांना 'क्वारंटाईन' केले जात आहे. मात्र हीच 'क्वारंटाईन' केलेली लोक या ना त्या कारणाने गावभर,अनेकांच्या संपर्कात, फिरतांना दिसत आहेत.यांना अडवायचे कुणी, का फिरतो म्हणून प्रश्न करून भांडण, तंटया सारखे प्रकार घडत आसल्याने अंगावर घ्यायचे कुणी अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे. त्यामुळे ग्रामस्थरावरील नागरिकांत 'तेरी भी चूप मेरी भी चूप.. या वाक्या प्रमाणे ग्रामीण भागात परिस्थिती पहावयास मिळत आहे.यामुळे वेळीच खबरदारी न घेतल्यास येणाऱ्या काळात संभव्य धोका निर्माण होऊ शकतो हे मात्र नक्की. त्याचबरोबर ग्रामीण भागात सूट दिलेल्या दिवशी तीच गर्दी, ना सोशल डिस्टन्स, ना मास्क चा वापर ,नसल्यामुळे त्याच धर्तीवर ग्रामपंचायत कडून मास्क न वापरणाऱ्या साठी दंडाच्या दवंड्या आल्या किती जणांना दंड केला हा भाग वेगळा. पण त्याची अंमलबजावणी साठी पुढाऱ्यांना सगेसोयरे, गावकीच राजकारण, त्यात आडकाठी ठरत असल्याचे दिसत आहे .त्याच बरोबर कदाचीत पुढाऱ्यांना भविष्याच्या राजकारणाची चिंता असावी.त्यामुळे नागरिकांनी स्वतः आपली व आपल्या कुटंबाची, त्याच बरोबर समाजाची काळजी घेण्याची गरज आहे.
Leave a comment