अंबाजोगाई | वार्ताहर
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास हाफकिन महामंडळाने सात नवीन व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत.
हाफकीन जीव - औषध निर्माण महामंडळाचे
राजेश देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून हे 7 व्हेंटिलेटर्स त्यांच्याकडील सीएसआर निधीतून स्वाराती रुग्णालयाला मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
पालकमंत्री मुंडे यांनी गेल्या आठवड्यात स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात भेट देऊन तेथील कोविड - 19 उपाययोजनेसह अन्य साधन सामग्री व सर्व सुविधांचा आढावा घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हाफकीनमार्फत रुग्णालयाची अनेक वर्षांपासूनची एमआरआय मशीनची मागणी पूर्ण केली. या मशीनची खरेदी विहित निविदेमार्फत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आतापर्यंत स्वारातीमध्ये 13 व्हेंटिलेटर्स असून यापैकी तीन व्हेंटिलेटर हे खास कोविड - 19 कक्षासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित 10 रुग्णालयातील नेहमीच्या उपचारांसाठी उपलब्ध आहेत. ते मुंबईतून रवाना झाले असून शुक्रवारी (दि. २२) रुग्णालयात दाखल होतील अशी माहिती हाफकीनचे राजेश देशमुख यांनी दिली.
Attachments area
Leave a comment