आज अहवाल मिळणार
केज | वार्ताहर
केज तालुक्यात मुंबईवरून परतलेल्या दोन जणांचे अहवाल कोरोना पाँजीटीव निघाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे,यामुळे आता कोरोना आजाराने ग्रामीण भागात प्रवेश केल्यानंतर पाँजीटीव रूग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण अठरा जणांचे स्वँब अहवाल तपासणीसाठी लातूरला पाठवण्यात आले असल्याचे ता.अरोग्य.अ. विकास आठवले यांनी सांगितले. त्यापैकी बारा जणांचे बीड येथून तर सहा जणांचे स्वँब केज येथून दि. २० रोजी पाटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक व प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. दि. २१ रोजी संध्याकाळी त्यांचे अहवाल मिळतील
मंगळवारी मुंबई येथून आलेल्या दोन जणांना त्रास होत असल्याने पाठविण्यात आलेल्या स्वॅबच्या अहवालानंतर केज तालुक्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. चंदनसावरगाव आणि केळगाव या दोन्ही गावातील प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या दोन्ही गावांपासून सात किलोमीटरच्या परिसरातील एकूण २७ गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत.
Leave a comment