बीड | वार्ताहर
पाटोदा तालुक्यात तीन आणि वडवणी शहरात एक कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आल्यानंतर बीड जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणचे कंटेनमेंट झोन जाहीर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण पाटोदा शहर आता कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. तर, पाटोदा तालुक्यातील वहाली येथेही कोरोनाग्रस्त आढळल्याने वहाली, सावरगाव घाट, निवडुंगा, वागदरा वस्ती, सप्रे वस्ती या पाच गावांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आला.
वडवणी शहरातील साळींबा रोडवरील कोर्टासमोरील इमारत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. तर या इमारती सभोवतालचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. वरील सर्व गावे आणि परिसर अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment