बीड | वार्ताहर
कोरोनाचे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण वाढल्याने जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण (ओपीडी)विभाग हा आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली .
बीड जिल्ह्यात गेली चार दिवसात 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयाची संपूर्ण इमारत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखून ठेवण्यात आली असून वेगवेगळ्या रुग्णलयात सर्व विभाग कार्यरत करण्यात आले आहेत .दरम्यान गेली दोन महिन्यांपासून सुरू असलेला ओपीडी विभाग देखील आता आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालयात स्थलांतरित झाला आहे.
Leave a comment