ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी पोलिसांना जाब विचारला
गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील ईटकूर येथे कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर हिरापूर हे गाव बफर झोनमध्ये असल्यामुळे गावामध्ये येण्या-जाण्यास संपूर्ण बंदी आहे. मात्र बुधवारी सकाळी विटा घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांशी देवाणघेवाण करून गावात हिरापूर गावात गेल्याचा आरोप करत ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी त्या टेम्पोला अडवत उपस्थित पोलिसांनाही टेम्पो गावात कसा सोडला? तुम्ही टेम्पोचालकाकडून पैसे घेतले असे म्हणत या घटनेची माहिती गेवराईच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना दिली.
बुधवारी सकाळी एक विटाचा टेम्पो हिरापूरमध्ये प्रवेश करू लागला. यावेळी पोलिस आणि त्या टेम्पो चालकात आर्थिक व्यवहार झाला. हे पैसे पोलिसांनी डायरेक्ट हातामध्ये घेतले नाही तर बाजुच्या हॉटेलमधील दोन टेबलाच्यामध्ये पैसे ठेवण्याच्या सूचना त्या चालकाला दिल्या. त्यानुसार त्याने पैसे ठेवले आणि विटाने भरलेला टेम्पो गावामध्ये नेऊ लागला. ग्रामसुरक्षा दलाचे तरुण टेम्पोला आडवे झाले, टेम्पोचालकाला गावात आलाच कसा असा प्रश्न करत त्यांनी टेम्पो महामार्गावर आणला. पोलिसांनाही ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी जाब विचारला. या सर्व घडामोडीचा व्हिडिओ या तरुणांकडे आहे. या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना देण्यात आल्यानंतर ते अधिकारी हिरापूर येथे दाखल झाले होते.
Leave a comment