सोशल मीडियावर सर्वसामान्यांचे जिल्हाधिकार्यांना आवाहन
नांदूरघाट । वार्ताहर
बीड जिल्हा पंधरा दिवस कडकडीत बंद ठेवा.. असे भावनिक आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना केले जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये केज तालुक्यामध्ये दोन रुग्णांचा समावेश आहे. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे.
सध्याची स्थिती लक्षात घेता सोशल मीडियावरुन जिल्हाधिकारी बीड यांना नागरिकांकडून भावनिक आव्हान करण्यात येत आहे, कलेक्टर साहेब, इतके दिवस लॉकडाऊनला बीड जिल्हावासियांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला, परंतु इतक्या दिवसाची तपश्चर्या कामाला येईना म्हणून अजून इथून पुढे पंधरा दिवस कडकडीत बंद ठेवावे. जेणेकरून परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाणार नाही,अशा भावनिक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांनी क्वॉरंटाईमध्ये राहून आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी करणे गरजेचे आहे, परंतु काही लोक या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत नाहीत, त्यामुळे हा संसर्ग वाढतो अशा देखील भावना सर्वसामान्यांच्या पोस्टमधून दिसून येत आहेत.
Leave a comment