गेवराई । वार्ताहर
कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठी देशात दि.23 मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे तेव्हा पासून गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामध्येच हातावर पोट असेलेले धोबी, न्हावी,सुतार, लोहार, समाजाचे आपले पारंपारिक व्यवस्याय बंद झाले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बाराबलुतेदार समाजाला आर्थिक मदत करावी अशी मागणी आ.लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
गेवराई तालुक्यातील धोबी,न्हावी,सुतार व लोहार समाजातील नागरिकांनी आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती म्हणून आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदन देऊन बाराबलुतेदार समाजाला आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती.दिलेल्या निवेदनात ते म्हणाले, देशात सध्या कोरोनो नावांच्या रोगाने थैमान घातले असुन अशा परिस्थितीत हातावर पोट असेलेल्या अनेक कुटुंबावर उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्रातील छोटे मोठे पारंपारिक व्यावसायिकावर उपासमारीचे मोठे संकट आले आहे तरी सरकारने महाराष्ट्रातील बाराबुलतेदार समाजाला आर्थिक मदत करावी अशी मागणी आ.पवार यांनी दिलेल्या निवेदनात केली आह.े
Leave a comment