बीड: खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकर्यांना पिक विमा उतरवण्यासाठी सरकारने मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांसाठी विमा कंपनीची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके यांनी केली आहे मराठवाड्यातील दहा जिल्ह्यात शेतकर्यांचा पिक विमा उतरवण्यासाठी अजूनही विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे गेल्या वर्षीही सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांचा पिक विमा उतरवण्यासाठी विमा कंपनीची तात्काळ नियुक्ती करावी अद्याप पर्यंत कुठलीही विमा कंपनी हे काम करण्यास तयार झालेली नाही येणार्या खरीप आणि रब्बी हंगामात शेतकर्यांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सरकारने आता विमा कंपनीची नियुक्ती करणे गरजेचे आहे शासनाने विमा कंपनीची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी अरुण डाके यांनी केली आहे.
Leave a comment