बीड । वार्ताहर
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठीलॉकडाऊन करण्यात आलेले आहे. या दरम्यान सर्वसामान्य नागरीकांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी राशनमार्फत धान्याचा पुरवठा केला जात आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशांना मोफत धान्य देण्यात यावे अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली होती. याची दखल राज्याच्या पुरवठा विभागाने घेतली असून मे आणि जून या दोन महिन्याचे धान्य मोफत देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत केलेल्या मागणीची दखल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली. तसा आदेश सहसचिवांनी काढला आहे.
गेल्या 50 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान सर्वसामान्य नागरीकांचे हाल होवू लागले आहेत. शासनाने राशन दुकानावर धान्याचा पुरवठा सुरू केला असला तरी अनेक नागरीकांकडे राशन कार्ड नाहीत. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशा नागरीकांना राशन मार्फत अन्नधान्याचा मोफत पुरवठा करावा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल ना.छगन भुजबळ यांनी घेवून मे व जून या दोन महिन्यांकरिता प्रतिव्यक्ती 5 किलो अन्न धान्य मोफत देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. राज्यातील विना शिधापत्रिका धारक सर्व विस्थापित मजुरांना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्याचे निर्देश पुरवठा विभागाने दिलेले आहेत.
Leave a comment