आष्टी । वार्ताहर
शहरातील होमिओपॅथीचे एमडी डॉक्टर सचिन चालक यांनी बुधवारी (दि.20) आष्टी शहरात त्याच्या क्लिनिकमध्ये आष्टीकरांना कोरोनाच्या आजारापासुन बचाव करण्यासाठी आयुषने जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता प्राप्त केलेले औषध मोफत वाटप केले. आज जवळपास 8 हजार 560 नागरिकांनी ही औषधी रांगेत उभे राहून आंतर पाळत सर्वानी मास धारण केलेले होते.
दोन दिवस ते हे औषधी मोफत वाटप करणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे डॉ. सचिन चालक यांनी आवाहण केले आहे. डाँक्टर चालाक म्हणाले, अशा कठीण स्थितीत कोरोनासारख्या महाभयनक आजाराने संपूर्ण देश नव्हे तर जग चिंतेत पडले आहे. आपल्या राज्यातही फार मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. त्याकरिता आपली प्रतिकार शक्ती या औषधीमुळे नक्कीच मजबुत राहणार दर तीन महिन्याला तीन सकाळी चार गोळ्या घ्यायचा आहेत.
Leave a comment