तलवाडा । वार्ताहर
कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार घातलेला आहे. या रोगाला थांबण्यासाठी भारत देशात व राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आलेली आहे. सरकार उपाययोजना करण्यासाठी तत्पर आहे. सर्व नियमांचा देश व राज्य व जिल्हा गावात पालन करताना नागरिकांचे चित्र दिसत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा सेविका, सरपंच पोलिस पाटील व सामाजिक कार्यकर्ते झोकून देवून काम करत आहेत. दरम्यान तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 4 हजार 345 नागरिकांचा 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पुर्ण झाला आहे.
शासनाने राज्यात व दुसर्या जिल्ह्यात आले लोकांना आपल्या गावात येण्यासाठी सुट्टी दिली होती. त्यांनी आपल्या जिल्ह्यात दाखल झालेले आहे. मुंबई, पुणे औरंगाबाद अनेक ठिकाणचे लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगावी व दुसर्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी. आलेल्या लोकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी जेणेकरून आपल्या कुटुंबाला आपल्या मित्रपरिवाराला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख रियाज, डॉक्टर मुकेश कोचोरिया, डॉक्टर शेख अजर, यांनी केले आहे. तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 44 गावाची लोकसंख्या 59 हजार 894 असून त्यांचे सर्व्हेक्षण केले आहे. तर परिसरात एकुण 5 हजार 292 ऊसतोड मजुर परतलेले आहेत. यापैकी 956 मजुर क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर 14 दिवस पूर्ण झालेल्या क्वॉरंटाईनमधील लोकांची संख्या 4 हजार 345 आहे. अशी माहिती तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळालेले आहे.
दरम्यान जालना जिल्ह्याच्या सीमेवर जोगलादेवी बंधारा व मंगरूळ बंधारा या दोन्ही रस्त्यावर दोन महिन्यापूर्वीपासून जेसीबीच्या साह्याने तलवाडा ठाण्यापर्यंमार्फत मोठमोठे खड्डे करून ठेवण्यात आलेले आहे. आपल्या जिल्ह्यात घुसखोरी झाल्याने आता खेड्यापाड्यातील अनेक गावात गावबंदी करण्याची चित्र पहावयास मिळत आहे. तसेच मुंबई पुणे औरंगाबाद जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची तात्काळ माहिती आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाला नागरिकांनी तात्काळ द्यावी असे आवाहन तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खेड्यापाड्यातील गावातील धास्ती बसलेली दिसत आहे तसेच तलवाडा सर्कलमधील राजापूर, राहेरी, किनगाव, गोविंदवाडी, तलवाडा, आनंदवाडी, लुखामसला, आगर नांदूर, आदी गावात गावकर्यांनी निर्णय घेतलेले चित्र पहावयास मिळत आहे.
Leave a comment