नेकनूर । वार्ताहर
मागचे दोन महिने ग्रामीण भागात शासनाच्या निर्बंधाचे काटेकोर पालन केले गेले यामुळे ग्रामीण कुटुंबाला आधार असलेला दुधाचा व्यवसाय बुडाला तेल, मीठ, साखरेचे वांदे झाले असतानाही हार न मानता तोंड देणार्या ग्रामीण भागाला पुणे-मुंबईच्या माणसांनी अखेर अडचणीत आणले.तिकडून आलेलेच कोरोना बाधीत निघू लागले.ज्याची भीती होती तेच पुढे उभे राहिल्याने ग्रामीण भाग हादरला आहे. दोन महिने कटाक्षाने पाळलेल्या गोष्टीवर पाणी पडल्याची भावना निर्माण झाली आहे.
कोरोनाची झळ प्रत्येकालाच मोठ्या प्रमाणात बसली मागच्या दोन महिन्याच्या कालावधीत शासनाच्या निर्बंधाचे पालन गाव खेड्यांनी काटेकोरपने केल्याने हा व्हायरस शहरापुरता मर्यादित होता. दोन महिन्यात ग्रामीण भागातील कष्टकर्यांच्या प्रपंचाला हातभार लावणारा दुधाचा जोडधंदा अडचणीत होता यामुळे हजारो लिटर दूध गावागावात वाटोळे झाले. दुधाच्या पैशातून भागणार्या किराणाची त्यामुळे अडचण झाली तेल ,मिठ साखरेचे वांदे झाले असे असतानाही खंबीर उभा राहिलेला ग्रामीण भाग शहरातील आपल्याच माणसाने आता अडचणीत आणून सोडला आहे .शहरातील लोकांना उपजीविकेचे साधन नसल्याने अनेकांनी गावचा रस्ता धरला. शासनानेही अटी बंधने घालून त्यांची गावाकडची वाट मोकळी केली मात्र चोरून लपून गावात येऊन शिरजोरी करणार्या या माणसांनी आपलीच माणसे अडचणीत आणली. दोन दिवसापासून कोरोना पॉझिटिव चा आकडा अठरा च्या घरात पोहोचला तो याच शहरी माणसामुळे त्यांच्यामुळे निर्बंधापासून सूट मिळवणार्या ग्रामीण भागातील अनेक गावांना कंटेनमेंट,बफर झोनमुळे पूर्णवेळ संचारबंदीत अडकावे लागले आहे. पेरणी तोंडावर आली असताना शहरातून आलेल्या माणसांच्या आडमुठेपणाचा तान सहन करण्याची वेळ ग्रामीण माणसावर आली आहे. प्रशासनाने अशा माणसांना वेळीच गावापासून दूर सारावे शिवाय या माणसांनी हुशारी बाजूला ठेवत प्रशासनाला काही दिवस सहकार्य करत आपल्या गावांची सुरक्षितता कायम ठेवणे गरजेचे आहे.
Leave a comment