गेवराई । वार्ताहर
भारत देश सध्या कोरोना या महाभयंकर संकटाशी सामना करत असून गाव पातळीवर या रोगाच्या बचावासाठी गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य रात्रंदिवस झगडत आहेत मात्र यांच्यासाठी विमा संरक्षण नाही.तरी शासनाने यांना विमा संरक्षण व शासकीय अनुदान तातडीने मंजूर करावे अशी मागणी सर्वच सरपंचाच्या वतीने गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील सरपंच सौ. गोदावरी सिद्धेश्वर काळे, उपसरपंच योगिता शिवाजी काळे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात गावातील अडचणीला सामोरे जावून गावचे सर्व प्रश्न सोडविण्याचे काम लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंच करीत आलेला आहे.सध्या 21 व्या शतकात जागतिक संकट म्हणून कोरोना हे मोठे संकट आहे.या रोगाची उत्पत्ती चीन मध्ये झाली असून ग्रामीण भागामध्ये या रोगाचा अत्यंत विपरीत परिणाम दिसून येत आहे.या मध्ये स्तलांतरीत झालेले ऊसतोड कामगार, उदरनिर्वाह साठी गाव सोडून गेलेले सुशिक्षित बेकार यांच्या उपजीविकेच्या प्रश्न गंभीर आहे.गावचा प्रथम नागरिक म्हणून या प्रश्न नी सरपंचाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.या कडे शासनाचे दुर्लक्ष दिसून येते.क्वॉरंटाईन केलेली व्यक्ती अचानक गावात प्रवेश करून इतरांनाही त्याचा प्रादुर्भाव होईल असे गैरवर्तन करतात.यातून सरपंचाला वेळोवेळी वाद विवादाचा सामना करावा लागतो व अशा या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्ती बरोबर संबंध येतो.यामुळे सरपंच व लोकप्रतिनिधी च्या जीवावर बेतू शकते.महत्त्वाचे म्हणजे गावातील सरपंच व इतर लोकप्रतीनिधींना विमा संरक्षण केलेला नाही.यामुळे त्यांची जीविताची हमी नसल्यामुळे ते पूर्णतः नाराज आहेत. या उलट मात्र गावपातळीवर ग्रामसेवक , तलाठी, अंगणवाडी मदतनीस-ताई, आशा वर्कर, संगणक परीचालक यांना प्रत्येकी रुपये 25 लक्ष विमा संरक्षण रक्कम शासनाने घोषित केली आहे.याच धर्तीवर कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर धडपडणार्या लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना शासनाने तातडीने विमा संरक्षण रक्कम घोषित करून भयमुक्त करावे अशी मागणी तालुक्यातील सर्व सरपंच लोकप्रतिनिधी च्या वतीने गोळेगांव ग्रामपंचायत च्या सरपंच गोदावरी सिद्धेश्वर काळे व उपसरपंच योगिता शिवाजी काळे यांनी केली आहे.
Leave a comment