वडवणी । वार्ताहर
भारत देशासह,महाराष्ट्रात सुध्दा कोरोना विषाणुच्या या महामारीच्या विरोधात संघर्ष करण्यात येत आहे परंतु संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक म्रुत्यु, म्रुत्यु दर हा महाराष्ट्रात जास्त आहे यामध्ये राज्य सरकार हे या महामारीच्या काळात हा विषाणू रोखण्यासाठी संपूर्ण अपयशी ठरत असुन यामध्ये राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राज्याचे नेतृत्वाचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील जनतेची दयनीय अवस्था झालेली आहे राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला एक प्रकारे वार्यावर सोडलेले आहे तरी राज्यात सरकार, प्रशासन आहे का नाही असा प्रश्न जनतेला पडला आहे तरी राज्य सरकारने कोरोना विरोधात योग्य त्या उपाययोजना राबवुन जनतेला विशेष आर्थिक पँकेज द्यावे अशी मागणी महाराष्ट्र बचाव आंदोलनातंर्गत भाजप वडवणी तालुका अध्यक्ष पोपटराव शेंडगे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले असुन यामध्ये सर्वाधिक रूग्ण व मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत. यामध्ये कोरोना विरोधात केंद्र सरकारने ज्या सुचना आखुण दिल्या त्या सुचना राबविण्यास राज्य सरकार अपयशी ठरत आहे. केंद्र सरकारने कोरोना विरोधात लढण्यासाठी अनेक माध्यमातून निधी दिला आहे परंतु तो निधी कोठे व कधी खर्च केला जात आहे याची माहिती जनतेला द्यावी, केंद्र सरकारने आधार भुत किंमतीच्या आधारावर शेतीमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी करून हि राज्य सरकार शेती माल खरेदी करत नाही, शेतकर्यांना बिनव्याजी पिक कर्ज द्यावे, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. तात्काळ उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे भाजपा वडवणी तालुका अध्यक्ष पोपटराव शेंडगे, बाजार समिती सभापती दिनकरराव आंधळे, धनराज मुंडे यांनी केली आहे.
Leave a comment