आष्टीत काळ्या फीत लावून काम ठेवले सुरु
आष्टी । वार्ताहर
नियमित शासन सेवेमध्ये अनुभवाच्या व सशिक्षणाच्या आधारे बिनशर्त समायोजन करावे,समायोजन होईपर्यंत व समायोजनानंतर उर्वरीत कर्मचार्यांनाराष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये मंजुर असलेली नविन वेतनपध्दतीने निर्गमित आदेशापासून पूर्ण फरकासहित वेतन तत्काळ देण्यात यावे,यापुर्वी राज्य शासनाने जसे मस्टर कारकुन, अंशकालीन कर्मचारी,बंधपत्रीत आरोग्य परिचारिका,वैद्यकीय अधिकारी,आमदार निवास कर्मचारी आदींचे जसे सरळ समायोजन निर्णय घेतला आहे त्याच प्रमाणे आमचे समायोजन व्हावे या व ईतर मागण्यांसाठी आष्टी तालुक्यातील सर्व कंत्राटी (एनआरएचएम) अधिकारी व कर्मचार्यांनी दि.19 मे पासून काळ्या फित लावून काम सुरु ठेवुन सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत.
कोरोनाच्या लढ्यात आरोग्य विभागात कोविड- 19 उपचार सुविधांच्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी या कोरोना महामारीच्या लढाईत सर्व प्राणपणाने लढत आहेत अशा परिस्थीतीत पंधरा पंधरा तास सेवा देवुन आपले कर्तव्य बजावत आहेत. जीव धोक्यात घालून काम करीत असताना सरकारकडून आम्हांला डावलले जात असल्याने या कर्मचार्यांत रोष उफाळू लागला आहे.कंत्राटी कर्मचार्यांना कायम करण्याऐवजी नव्याने भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असल्याने सर्व कंत्राटी कर्मचार्यांनी 26 मेपासून काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर समकक्ष रिक्त पदावर बिनशर्त समायोजन केले नाही तर दि.26 मे पासून राज्यात सर्व ठिकाणी काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
Leave a comment