मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. वर्षा बंगल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आपआपल्या जिल्ह्यांतून अनेक मंत्री या बैठकीत उपस्थित राहिले. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लोकांची लॉकडाऊनच्या काळाच गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गेल्या महिन्यात 17 मार्चला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती, त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्यय
केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत निर्णय.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.
शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.
कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती.
Leave a comment